राज्यात बंदी असलेल्या गोवंशीय जातीचे 1 हजार 910 किलो गोमांस व 11 जिवंत जनावरांची सुटका स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर येथील व्यापारी मोहल्ला येथून केली आहे. त्यांच्याकडून 5 लाख 2 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मोहम्मद कैफ अब्दुल मस्जित कुरेशी, अब्दुल आसिफ कुरेशी, शाहिद मुनाफ कुरेशी (सर्व रा. ब्यापारी मोहल्ला,नगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नाव आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता सोफियान कुरेशी (रा. व्यापारी मोहल्ला, नगर (फरार) यांचा मालकीचा कत्तलखाना असून तो चालवतो असे सांगितले. त्याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.
मात्र, त्यांच्या ताब्यातील 3 लाख 82 हजार रुपये किंमतीचे 1 हजार 910 किलो गोमास, 1 लाख 20 हजार रुपयांची 11 लहान मोठी जिवंत जनावरे व 500 रुपये किंमतीचा सत्तुर व सुरा असा 5 लाख 2 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस शिवाजी अशोक ढाकणे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.