सावेडी येथील बंधन लॉन महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महायुतीच्या नेत्यानी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी पालकमंत्री राधकृष्ण विखे पाटील, खा सदाशिव लोखडे, खा.सुजय विखे, भाजपाचे प्रदेश आ राम शिंदे, राष्ट्रवादीचे आ संग्राम जगताप, भाजपाचे आ. बबनराव पाचपुते, आ.मोनिका राजळे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे, भाजपचे प्रदेश सदस्य प्रा.भानुदास बेरड, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, शिवसेनेचे नेते बाबुशेट टायरवाले, संपर्कप्रमुख सचिन जाधव, संपर्कप्रमुख अनिल शिंदे, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, आरपीआयचे(आठवले गट) सुनील साळवे, यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार राम शिंदे म्हणाले की देशामध्ये नरेंद्र मोदींच्या माध्यमातून सरकार भक्कमपणे उभे आहे त्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत योजना पोहोचत आहे राज्यात देखील माहितीचे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचे विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला दरम्यान देशांमध्ये गृहमंत्री अमित शहा व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे तंत्रशुद्ध पद्धतीने लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहे कधी काही होईल हे काही सांगता येत नाही मी देखील अनेक राज्यांच्या प्रचारासाठी गेलो होतो त्यावेळी मला देखील अनुभव आलेले आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण उमेदवार असेल याबाबत देखील त्यांनी शंका उपस्थित केली. ज्या पद्धतीने इतर राज्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी धक्क तंत्र अवलंबले त्याचा पद्धतीने राज्यात देखील या धक्का तंत्राचा वापर होईल असेही त्यांनी सांगितले.
लोकसभा उमेदवारी…पक्षाकडून धक्कातंत्राचीही शक्यता…आ.राम शिंदेंच मोठं वक्तव्य
- Advertisement -