Tuesday, May 28, 2024

अहमदनगर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक, निवडणूक निरीक्षकांच्या नियुक्त्या

अहमदनगर दि. 25 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने 37-अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक निरीक्षक (जनरल) म्हणून रवी कुमार अरोरा, (आयएएस) यांची व निवडणूक निरीक्षक (पोलीस) म्हणून पी. अरवींदन (आयपीएस) यांची नियुक्ती केली आहे.

निवडणूक निरीक्षक (जनरल) रवी कुमार अरोरा, (आयएएस) यांच्याशी 9699755256 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. निवडणूक कालावधीत निवडणूक निरीक्षक (जनरल) रवी कुमार अरोरा, (आयएएस) यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह, छत्रपती संभाजीनगर रोड, येथे असणार आहे. निवडणूक निरीक्षक (जनरल) यांचे संपर्क अधिकारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 9850210740 असा आहे.

निवडणूक निरीक्षक (पोलिस) पी. अरवींदन (आयपीएस) यांच्याशी 9022073087 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. निवडणूक कालावधीत निवडणूक निरीक्षक (पोलिस) पी. अरवींदन (आयपीएस) यांचा मुक्काम वसंतकिर्ती पोलीस विश्रामगृह, तोफखाना पोलिस स्टेशन मागे, सावेडी येथे असणार आहे. निवडणूक निरीक्षक (पोलिस) यांचे संपर्क अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक नंदकुमार धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 9423583955 असा असल्याचे निवडणूक निरीक्षकांचे समन्वय अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles