लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान (सोमवारी) पार पडले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या चुरशीचा सामना पहावयास मिळाला. किरकोळ प्रकार वगळता जिल्हाभरात मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली. मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या.अनेक गावात चुरशीने मतदान झाल्याचे पहावयास मिळाले. मतदान घडवून आणण्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते प्रयत्न करीत होते.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात 63.77 टक्के मतदान. सर्वाधिक कर्जत जामखेड : 65.80, पारनेर 63.97 टक्के. नगर शहर : 57.60, राहुरी : 69.79, शेवगाव : 62.74 व श्रीगोंदा : 62.54