Wednesday, June 25, 2025

राहुरी, पारनेरमध्ये 70 टक्कयांपेक्षा अधिक मतदान….लंके कि विखे ?..कौल कोणाला?

अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर दोन वेळेस निवडणूक प्रशासनाने मतदानाची आकडेवारी जाहीर केली. पण मंगळवारी रात्री निवडणूक प्रशासनाने अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात सरासरी 66.61 टक्के मतदान झाले आहे. राहुरी व पारनेर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. या दोन तालुक्यात तब्बल 70 टक्के मतदान झाले आहे. निलेश लंके हे आमदार राहिलेल्या त्यांचे होमग्राइंड असलेल्या पारनेर मतदारसंघात सर्वाधिक 70.13 टक्के मतदान झाले आहे. त्यानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात 70 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लंकेंसाठी बळ लावले होते. तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सुजय विखेंसाठी ताकद लावली आहे.नगर शहरात 62.50 टक्के मतदान झाले आहे. तर श्रीगोंदा मतदारसंघात 67. 90 टक्के मतदान झाले आहे. कर्जत जामखेडला 66. 61 टक्के मतदान झाले आहे. तर शेवगाव मतदारसंघात 63 टक्के मतदान झाले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles