आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमधील शरद पवार गटाच्या नगर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची काल मुंबईत राष्ट्रवादी भवनमध्ये आढावा बैठक पार पडली. बैठकीला स्वत: शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, आ.अनिल देशमुख, आ.जितेंद्र आव्हाड, जिल्हा निरीक्षक अंकुश काकडे, आ. प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आ. राहुल जगताप, माजी आमदार दादा कळमकर, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी येणार्या निवडणुकीत राष्ट्रवादीला नगर लोकसभा जिंकावयाची असल्यास एक तर सामान्य चेहरा अथवा आ. रोहित पवार अथवा आ. प्राजक्त तनपुरे यांच्यासारख्या तोलामोलाच्या उमेदवाराची गरज असल्याचे स्पष्ट केले.
प्रताप ढाकणे, राहुल जगताप, अरूण कडू, दादा कळकर, अभिषेक कळमकर यांनी आपल्या मनोगतात ही मागणी लावून धरली.