Sunday, December 8, 2024

नगर लोकसभेसाठी आतापर्यंत विखेंसह जाधव, गायकवाड, शेख यांचे उमेदवारी अर्ज दाखल…

नगर – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 37- अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सोमवारी चार उमेदवारांनी सहा नामनिर्देशनपत्र दाखल केले.

भारतीय जनता पार्टीतर्फे डॉ. सुजय विखे पाटील यांनी तीन नामनिर्देशनपत्र, डॉ. कैलाश निवृत्ती जाधव- महाराष्ट्र विकास आघाडी एक नामनिर्देशन पत्र, भागवत धोंडीबा गायकवाड-समता पार्टी एक नामनिर्देशनपत्र तर ऍड.महंमद जमीर शेख-अपक्ष यांनी एक नामनिर्देशन पत्र दाखल केले. आज पाच जणांना १२ नामनिर्देशन पत्राचे वितरण करण्यात आले.

37-अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार 25 एप्रिल, 2024 ही नामनिर्देशनपत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. 26 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार आहे. 29 एप्रिल रोजी उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक राहणार आहे. 13 मे रोजी रोजी मतदान तर 4 जून,2024 रोजी मतमोजणी होणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles