Tuesday, June 25, 2024

लोकसभा निवडणूक निकाल…. मंगळवारी या भागात सर्व वाहनांना मनाई…

ज्याअर्थी लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ चे मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ नागापुर एम.आय.डी.सी. अहमदनगर येथे दिनांक ०४/०६/२०२४ रोजी ३७ अहमदनगर व ३८ शिर्डी या मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. सदर मतमोजणी ठिकाणी मतमोजणी कामी अधिकारी/कर्मचारी तसे उमेदवार प्रतिनिधी व निकाल ऐकण्याकरित मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व नागरीक उपस्थीत राहाण्याची शक्यता आहे. सदर मतमोजणी प्रक्रिया सुरळीत होणेकरीता तसेच निकाल ऐकण्याकरित मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या कार्यकर्ते व नागरीकांचा वाहतुकीमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कार्यकर्ते व नागरीकांचे सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातुन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ नागापुर एम.आय.डी.सी. अहमदनगर येथे येण्या-जाण्याच्या मार्गावरील वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे अशी माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी मी राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर मला मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१) (ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन आदेशात नमुद केल्याप्रमाणे दि. ०४/०६/२०२४ रोजीचे ००.०१ ते २१.०० वा.पावेतो खालील नमुद मार्ग “नो व्हेईकल झोन (वाहन विरहीत क्षेत्र)” घोषीत केल्याचे आदेश जारी करीत आहे.

साईरत्न हॉटेल चौक एल अॅण्ड टी कॉलनी पारस कंपनी पर्यंत जाणरा रस्ता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ लगतचे चारही बाजुचे रस्ते

प्रस्तुत आदेश परवानगी दिलेले शासकीय वाहने, संरक्षण विभागाची वाहने, स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेली वाहने यांना लागु राहणार नाही.

प्रस्तुतचा आदेश आज दि.०३/०६/२०२४ रोजी माझे सही शिक्यानिशी दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles