Tuesday, April 23, 2024

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी जवळीक सुजय विखेंच्या उमेदवारीचा मार्ग प्रशस्त करणार!

नगर : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार डॉ. सुजय विखे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चा होऊ लागली आहे. आठवडाभराच्या अंतराने दुसऱ्यांदा होणारी ही भेट केवळ कांदा प्रश्नावर होती की राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांसाठी याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच गेल्या आठवड्यात खासदार सुजय विखे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी कांदाप्रश्नावर भेट घेतल्याचे सांगितले होते. त्यानंतर लगेचच गुरुवारी पुन्हा महसूलमंत्री विखे व खासदार विखे या दोघांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री शहा यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शहा यांची भेट मिळणे दुरापास्त असताना विखे पिता-पुत्रांना लागोपाठ त्यांची भेट मिळणे राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय झाला आहे.

एकीकडे भाजपने लोकसभेसाठी अबकी बार ४०० पार असा नारा दिला आहे.‌ नगर दक्षिणेत सुजय विखे पाटील विद्यमान खासदार असले तरी पक्षातीलच नेते माजी मंत्री राम शिंदे यांनीही लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे वारंवार सांगितले आहे. तसेच उमेदवार दिल्लीतून निश्चित होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी लागोपाठ दोन वेळा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे उमेदवारी बाबतही विखे निश्चिंत झाल्याची चर्चा आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles