Saturday, May 18, 2024

पाकिटे वाटपावरून नगर दक्षिणेत आरोप प्रत्यारोप, पालकमंत्री विखेंनी रोहित पवारांना सुनावले…

नगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एकीकडे मतदान सुरु असताना महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांमध्ये मतदारांना पैसे वाटण्यावरून चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके, आ.रोहित पवार यांनी व्टिटरवर काही व्हिडिओ, फोटो टाकून विखेंची यंत्रणा पैसे, पाकिटे वाटत असल्याचा आरोप केला. आ.रोहित पवार यांनी तर थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर नाव न घेता टिका केली. पवार यांनी म्हटले आहे की, नगर दक्षिण मतदारसंघात आज ‘राजा’ असलेल्या प्रत्येकाच्या नावाने उत्तरेतून एक पाकीट आलं असून यात थोडा ‘प्रसाद’ आणि ‘मालक’मंत्री यांचं फुलाला मतदान करण्याबाबतचं निवेदन आहे. गम्मत म्हणजे अनेक गावांमध्ये स्वाभिमानी नागरिकांनी हा प्रसाद घ्यायलाच नकार दिला तर काही गावांत ‘यंत्रणे’ने दिलेल्या प्रसादापैकी अर्धा प्रसाद गावातल्या वाढप्यानेच खाऊन टाकला… आता ‘प्रसादात’ही आडवा हात मारला जात असेल तर आजचा ‘राजा’ कसा उदार होणार?

आ.्‌‍रोहित पवारांच्या टिकेला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही व्टिट करून उत्तर दिले आहे. विखे यांनी म्हटले आहे की, Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar) @RVikhePatil
·
बारामतीचा ‘प्रसाद’ नगरकरांना मानवणार नाही याची जाणीव @RRPSpeaks
झाली आहे. परभवाच्या नैराश्येतून ते आता वायफळ बडबड करायला लागले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles