एम. आर. शर्मा यांची कृषक भारतीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती
नगर, दि.6-एम. आर. शर्मा यांची कृषक भारती कॉ-ऑपरेटिव्ह लि. च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शर्मा यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक या व्यतिरिक्त संचालक (तांत्रिक) याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
1 सप्टेंबरपासून त्यंानी पदभार स्वीकारला आहे. शर्मा यांना अमोनिया आणि युरिया उत्पादनाच्या एकात्मिक सयंत्रासह संबंधित उपयुक्तता सयंत्रांमध्ये 42 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. कृभकोमध्ये 1982 मध्ये पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी म्हणून रूजू झाल्यानंतर, व्यवस्थापकीय संचालक पदावर पोहोचणारे ते पहिले पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी आहेत. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अमोनिया आणि युरिया कॉम्प्लेक्सच्या सुधारणेसाठी महत्वपूर्ण योगदान दिले. कोरोना काळात कच्च माल आणि कामगारांच्या अनुपब्धतेमुळे पश्चिम भारतातील बहुतेक खत संयंत्रे बंद करावी लागली. तेव्हा एम. आर. शर्मा यांनी विक्रमी उर्जा कार्यक्षमतेसह उत्पादन सुविधा 100 टक्क्यांहून अधिक क्षमतेने चालू ठेवण्यात यश मिळवले. याबद्दल त्यांना सदर्न गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीतर्फे उत्कृष्ट सीईओ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या प्रतिष्ठीत द सीईओ मॅगझिनमध्ये त्यांची निवड करण्यात आली.या निवडीबद्दल पाथर्डी येथील जगदंबा कृषी भंडारचे राहुल कारखिले, सहकार महर्षी काष्टी सोसायटीचे राकेश पाचपुते आदींनी अभिनंदन केले आहे.
एम. आर. शर्मा यांची कृषक भारतीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती
- Advertisement -