माळी महासंघाची राजकीय हक्क परिषद अहिल्यानगर येथे थाटात संपन्न
अहिल्यानगर:- माळी महासंघ अहिल्यानगर आयोजित राजकीय हक्क परिषद 2 ऑक्टोबर 2024 रोजी नक्षत्र लॉन्स बुरुडगाव येथे आयोजित करण्यात आली होती. या हक्क परिषदेमध्ये माळी समाजाच्या लोकसंख्येनुसार स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा लोकसभा यामध्ये राजकीय पक्षांनी तिकीट वाटप करावे ही प्रमुख मागणी घेऊन तसा ठराव या परिषदेमध्ये मांडून मंजूर करण्यात आला. या परिषदेमध्ये माळी समाजातील तीन इच्छुक उमेदवारांनी उपस्थिती दर्शवली. तसेच ओबीसी संघर्ष योध्दा मा. प्रा. लक्ष्मण हाके यांना झालेल्या धक्का बुक्की बाबत निषेध ठराव समंत करण्यात आला.
या परिषदेचे अध्यक्षस्थान माळी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.संतोष अण्णा लोंढे सभापती स्थायी समिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी भूषवले. यावेळी भगवानराव फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, जालिंदर बोरुडे, अंबादास गारुडकर, बाळासाहेब भुजबळ, संजय गारुडकर, खंडू भूकन, शरद झोडगे, अण्णाजी गायकवाड, उपाध्यक्ष माळी महासंघ संतोष अण्णा जमदाडे, चंद्रशेखर दरवडे, डॉक्टर प्रमोद तांबे, राम पानमळकर, भूषण भुजबळ, रामनाथ शिंदे, मनोज भुजबळ, राहुल साबळे, किरण अंत्रे, राजेंद्र अनाप, योगेश गाडीलकर, विवेक फुलसौंदर, नंदकुमार नेमाने, मनोज फुलसौंदर, गणेश धाडगे, संदीप दळवी, योगेश फुलारी, यश भांबरकर, दशरथ हजारे, रविंद्र अनारसे, जयश्री व्यवहारे, पद्मा दळवी, श्रीमती. राधा आहेर, ज्योती तोड़कर, उज्वला दरवडे विकास रासकर तसेच माळी महासंघाचे सर्व पदाधिकारी तसेच माळी समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व करणारे समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.