Tuesday, April 23, 2024

नगर – मनमाड इलेक्ट्रीक डबल लाईन रेल्वे. निंबळक ते वांबोरी आठव्या टप्प्याची चाचणी यशस्वी

नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत निंबळक ते वांबोरी या 22
कि .मी. अंतराची चाचणी गुरुवारी घेण्यात आली लवकरच नगर ते मनमाड पर्यंतचे हे काम पुर्ण होणार असुन यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे . या पुर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजीनचा वापर होत आहे .गेल्या तीन वर्षापासुन नगर ते मनमाड द्रुतगती ( डबललाईन ) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे . या पुर्वि कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई , अंकाई ते अंकाई किल्ला ,अंकाई किल्ला ते मनमाड ,कोपरगाव ते कान्हेगाव,बेलापूर ते पुणतांबा,बेलापूर ते पढेगाव
या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आता गुरुवारी ( दि. 29) रोजी 22 कि .मी. डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली. आता ऐकूण 107 की मी अंतराची चाचणी पूर्ण घेतल्याची माहिती दीपक कुमार उप मुख्य अभियंता (बांधकाम) अहमदनगर ,यांनी दिली .

मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपुर्ण टप्पा येतो . मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडी चा वेग कमी होता . तसेच सिंगल लाईन मुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता . तासोनतास रेल्वे गाडी एकाच जाग्यावर थांबुन ठेवावी लागत . मात्र आता हा पुर्ण मार्ग इलेक्ट्रीक इंजीनचा वापर करून डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाडयांचा थांबा आता बंद होणार आहे . तसेच या कामामुळे रेल्वे ताशी 130प्रति किमी वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे . तीन वर्षापासुन हे काम सुरू आहे .पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पुर्ण होणार आहे .गुरुवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. नगर ते मनमाड पर्यतंचा टप्पा पुर्ण होण्यास अजुन एक वर्ष लागतील असा अंदाज आहे यावेळी ताशी 130 वेगाने धावली रेल्वे

चौकट : या अधिकाऱ्यांच्या उपस्थीतीत निंबळक ते वांबोरी द्रुतगती लोहमार्गाच्या चाचणीसाठी घेतली.
रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी ए के पांडे, मुख्य अभियंता राजकुमार वानखेडे, उप मुख्य अभियंता दीपक कुमार,कार्यकारी अभियंता डी पी पटेल,कार्यकारी अभियंता संदीप सिन्हा,सहाय्यक कार्यकारी अभियंता आर जे गायकवाड,सेक्शन इंजिनिअर धर्मेंद्र कुमार,सेक्शन इजिनिअर आर डी सिंग,इजिनिअर सुद्धांसू कुमार,ज्युनियर इंजिनियर,प्रगती पटेल,एक्झिकेटीव, इंजिनिअर व आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles