Saturday, March 2, 2024

सात महिन्यात एकदा देखील आले नाही. बाकीचे येऊन दमलेत… जरांगे पाटील यांचा अजितदादांवर निशाणा

मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा मुंबईकडे निघाली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधत संविधानाच्या मार्गाने प्रश्न सोडवू त्यांनी धीर धरावा, असे म्हटले होते. त्याला मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

धीर काय असतो हेच कळेना. त्यांना म्हणा एकदा या तरी. लांबच राहाता नुसते. एकदा या. दूध का दूध, पाणी का पाणी करू. सात महिन्यात एकदा देखील आले नाही. बाकीचे येऊन दमलेत. सात महिने वेळ दिला आहे. हा वेळ थोडा नाही. उलट अजितदादांनी गोरगरिब मराठ्यांच्या बाजूने बोलले पाहिजे, अजितदादा येत नसतील तर त्यांना आम्ही एसटीचे तिकीट काढून देऊ शकतो.’ असे म्हणत अजित पवारांना टोला लावला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles