Saturday, March 2, 2024

भगवं वादळ रविवारी नगरमध्ये….१५० एकरवर भाेजन, पार्किंग तसेच मुक्कामाची व्यवस्था

मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचे सकल मराठा समाजाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पाथर्डी रस्त्यावरील बाराबाभळी (ता. नगर) येथे समारे १५० एकरवर भाेजन, पार्किंग तसेच मुक्कामाची जाेरदार तयारी करण्यात आली आहे. साधारणतः ही मराठा आरक्षणाची दिंडी रविवार (ता. २१) सायंकाळी ७ च्या सुमारास नगरमधील बाराबाभळी येथे येणार असून २५ लाख मराठे येण्याचा अंदाज मराठा सकल माेर्चाचे गाेरख दळवी यांनी सांगितले.

पाथर्डी रस्त्यावरील बाराबाभळी येथे मराठा समाजाच्या वतीने नियाेजन करण्यात आले आहे. यावेळी १०० डाॅक्टरांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील स्वयंसेवक मदतीसाठी नगर शहरात येणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज २० जानेवारीपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथून पदयात्रेने मुंबईला जाणार आहे. या पदयात्रेत लाखो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. ही पदयात्रा अंतरवली सराटी शहागड, गेवराई, खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, नगर, केडगाव, सुपा, शिरुर, वाघोली, शिवाजी नगर, पुणे, मुंबई एक्सप्रेस हायवे, लोणावळा, पनवेल, मुंबई अशा मार्गाने जाणार आहे. .

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles