नगर -अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या अहमदनगर जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेची तेहतीससावी वार्षिक सर्वसाधारण सभा व मराठा सेवा संघ व मराठा नागरी पतसंस्थेच्या वतीनेसभासदांच्या व मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थी व विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी व सभासदांचा सत्कार शनिवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मार्केट यार्ड येथील शेतकरी निवास सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष इंजिनिअर विजयकुमार ठुबे , मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुरेशराव इथापे व उपाध्यक्ष किशोर मरकड यांनी दिली.
अधिक माहिती देताना इंजि. ठुबे पुढे म्हणाले की, गेली 32 वर्ष समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणवंताचा सत्कार पतसंस्थेच्या माध्यमातून केला जातो याही वर्षी तो करण्यात येणार आहे. याचबरोबर पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा यावेळी होणार आहे. पतसंस्थेने 30 कोटीची ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण केले असून हे येत्या वर्षभरात 50 कोटीची ठेवी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. तसेच येत्या दोन वर्षात शंभर कोटीच्या पुढे ठेवी कशा जातील याकडे संचालक मंडळ व व्यवस्थापन मंडळाचे लक्ष राहणार आहे. याचबरोबर पतसंस्थेच्या वतीने समाजातील उल्लेखनीय काम करणार्या आदर्शवत व्यक्तींचा मराठा समाज भूषण पुरस्कार देऊन तर वर्षी सत्कार करण्यात येतो याही वर्षी तो करण्यात येणार आहे तसेच यावेळी तरुण उद्योजकांना सुद्धा पुरस्कार देण्यात येणार आहे.
पतसंस्थेच्या इतिहासात प्रथमच निवडणूक झाली या निवडणुकीत जिजामाता सहकार मंडळाला घवघवीत यश मिळाले त्यामुळे माझ्यावर आणि संचालक मंडळावर जो विश्वास सभासदांनी दाखवला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ न देता पतसंस्थेच्या हिताचा विचार आम्ही करणार आहोत. पतसंस्थेच्या मुख्य शाखेचा मार्केट यार्ड ,भिंगार, पाथर्डी, नेवासा, संगमनेर व शेवगाव येथे शाखा असून लवकरच कर्जत येथे शाखा सुरू होणार आहे. सर्व तालुक्यात एक तरी शाखा असावी असा आमचा मानस आहे असेही इंजि.ठुबे म्हणाले.
तरी सभासद व गुणवंत, पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पतसंस्थेचे चेअरमन इंजि. विजयकुमार ठुबे, व्हाईस चेअरमन किशोर मरकड, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि.सुरेश इथापे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा संपुर्णाताई सावंत तसेच पतसंस्थेचे संचालक लक्ष्मणराव सोनाळे, ज्ञानदेव पांडूळे, राजश्री शितोळे, सतीश इंगळे, बाळकृष्ण काळे, प्रा.किसन पायमोडे, यशवंत शिंदे, अॅड. काशिनाथ डोंगरे, ज्ञानेश्वर अनभुले, इंजि.संभाजी मते, इंजि.बाळासाहेब सोनाळे, द्वारकाधिश राजेभोसले, डॉ.कल्पना ठुबे, अॅड.राजेश कावरे, राजेंद्र ढोणे, अच्युत गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड यांनी केले आहे.