ahmednagar meharabad
अहमदनगर: नगर शहराजवळील अरणगाव येथील मेहेरबाबांच्या समाधीस्थळी सोमवारी
(दि.१०) मौन दिन पाळण्यात आला. यावेळी जगभरातील हजारो भाविक उपस्थित होते. भाविकांनी दिवसभर बाबांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. तरी सर्वत्र शांतता होती. अवतार मेहेरबाबानी १० जुलै १९२५ पासून पुढील ४४ वर्षे मौन ठेवले होते.
यानिमित्त आजच्या दिवशी बाबांचे जगभरातील भक्त मौन दिवस पाळतात. आरणगाव येथे आज समाधीस्थळ सकाळी ६ वाजता. दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. दररोजची सकाळ व संध्याकाळची आरती आज करण्यात आली नाही. मेहेरबाबाची झोपडी दर्शनासाठी उघडण्यात आली होती. मौन दिनानिमित्त भारतासह जगभरातून मेहेरप्रेमी आले होते. यावेळी सर्वत्र शांतता होती. मेहेरबाबांनी ३ वेळा मौन पाळले होते परंतु १० जुलै, १९२५ रोजीची सुरु केलेले मौन त्यांनी
आयुष्यभर पाळले व एक शब्द कधीही उच्चारला नाही, ते ३१ जानेवारी १९६९ पर्यंत ४४ वर्षांपर्यंत बोलले नाहीत.