मेहकरी ग्रामपंचायतवर नंदू पालवे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय
मेहकरी येथे माजी सरपंच संतोष पालवे यांच्या पत्नी विद्या पालवे विरुद्ध भाग्यश्री पालवे यांच्यात लढत झाली. त्यात भाग्यश्री पालवे विजयी (१२८६) झाल्या. विद्या पालवे यांना ५५७ मते मिळाली. ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन होऊन विरोधक भूईसपाट झाले.