एमआयडीसी परिसरातील मोटारसायकली व शेतकन्यांच्या पाण्याच्या मोटारीची चोरी करणारी टोळी जेरबंद. ५,७०,००० रु. किमतीच्या तीन मोटारसायकली व दोन पाण्याच्या मोटरी व गुन्हयात वापरलेला टाटा एस कंपनीचा टेम्पो चोरट्यांकडून जप्त. एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी
दिनांक ०१/०७/२०२३ रोजी फिर्यादी नामे सोमनाथ भानुदास गिते वय २७ वर्ष र निर्मलनगर पाईपलाईन रोड अहमदनगर यांनी फिर्याद दिली की दिनांक ३०/०६/२०२३ रोजी रात्री २३/०० ते दिनांक ०१/०७४/२०२३ रोजी सकाळी ७० वा थे दरम्यान अहमदगर एमआयडीसी येथिल एक्साईड बॅटरी कंपनीच्या मोकळया पार्किंग मधुन त्यांची मोपेड मोटारसायकल क्र एम एच १६ सी के १३२९ हि कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली त्याबाबत त्यांचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गु. रजि नंबर ५८८/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) अविष्कार सुभाष वाघ २) शुभम ज्ञानदेव काळे ३) गौरव उर्फ अक्षय शंकर चव्हाण सर्व राहणार पिंपळगाव माळवी ता. जि. अहमदनगर यांनी केल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन वरील आरोपीना पिंपळगाव माळवी परीसरातून शिताफिने पकडले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) अविष्कार सुभाष वाघ वय २२ वर्ष रा. पिंपळगाव माळवी ता. जि. अहमदनगर २) शुभम ज्ञानदेव काळे वय २७ वर्ष रा. पिंपळगाव माळवी ता. जि. अहमदनगर ३) गौरव उर्फ अक्षय शंकर चव्हाण वय-२२ वर्ष रा. पिंपळगाव माळवी ता. जि. अहमदनगर असे सांगीतले. त्यांना सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर गुन्हयात चोरी गेलेली मोपेड मोटारसायकल क्रः एम एच १६ सी के १३२९ हि आरोपी नामे शुभम ज्ञानदेव काळे वय २७ वर्ष रा. पिंपळगाव माळवी ता.जि. अहमदनगर याचे ताब्यात मिळून आली. सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन हददीतून चोरी केलेल्या दोन विना नंबर स्पेलंडर मोटारसायकली व शेतक-याच्या शेतातुन चोरलेल्या दोन पाण्याचे मोटारसायकली व गुन्हयात वापरलेला टाटा एस कंपनीचा टेम्पो असा एकुण ५,७०,०००/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खरे सो. अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. श्री. संपत भोसले सो. उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. राजेंद्र सानप, सो. पोसई पोपट टिक्कल पोना/ १९०० विष्णु भागवत, पोकॉ/ १२१० किशोर जाधव, पोकों/ १०२४ नवनाथ दहिफळे, पोकों/ २३८४ सुरेश सानप, पोकों / २६३२ सुरज देशमुख, पोकों/ ७४३ जयशिंग शिंदे, यांचे पथकाने केलेली आहे.