मा उपविभागीय अधिकारी सा.बां.विभाग अ.नगर
विषय एम.आय.डी.सी. निंबळक रस्त्याचे काम सुरु न झाल्यास रास्ता रोको
आपणास निवेदन देण्यात येते की उपरोक्त विषयानुसार ह्या रस्त्याचा एक कोटी रु निधी मंजूर होऊन आणि निविदा प्रक्रिया संपुन दोन महिने उलटले तरी अद्याप ठेकेदार ऐजेंसी निवड झाली नाही . ह्या रस्त्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा करून देखील आपण ह्या रस्त्याची दुरावस्था गंभीरतेने घेत नाही. हा रस्ता प्रचंड वाहतुकीचा असल्याने तात्काळ काम सुरु करावे ही विनंती . अन्यथा शनिवार दिनांक 3 फेब्रूवारी रोजी निंबळक बायपास चौक येथे दुपारी बारा वाजता रास्ता रोको करण्यात येईल पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ दिलीप पवार, कोतकर बी.डी.,निलेश पाडळे, दत्तात्रेय कोतकर अशोक शिंदे शिवाजी दिवटे आदींच्या सह्या आहेत ह्याची आपण नोंद घ्यावी