Wednesday, April 17, 2024

नगर शहरात धारदार तलवार घेवून दहशत करणे तरुणाला भोवले

नगर – नागापुर येथे आंबेडकर चौक परिसरात बेकायदेशीरपणे धारदार तलवार बाळगणाऱ्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी पकडले आहे. त्याच्या ताब्यातून एक तलवार जप्त करण्यात आली आहे. सोमवारी (दि.१) दुपारी ही कारवाई करण्यात आली.

एमआयडीसीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे राहुल नितीन साबळे (रा. बोल्हेगाव) याचे कडे एक लोखंडी धारदार तलवार आहे. ही माहिती मिळताच त्यांनी एक पथक कारवाई साठी आंबेडकर चौक नागापुर येथे पाठवले. या पथकाने राहुल साबळे याला पकडून त्याची झडती घेतली असता त्याचेजवळ एक धारदार लोखंडी तलवार मिळुन आली. सदर तलवार त्याचेकडुन जप्त करुन त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई स.पो.नि. माणिक चौधरी यांचे मार्गदर्शानाखाली उपनिरीक्षक परदेशी, पो.हे.कॉ. नंदकिशोर सांगळे, राजु सुद्रिक, पो.ना. विष्णु भागवत पो.कॉ.किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, मोबाईल सेलचे पो.कॉ. राहुल गुंडु यांचे पथकाने केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles