Sunday, July 14, 2024

अहमदनगर एमआयडीसी सह्याद्री चौकात सिमेंटचे ब्लॉक डोक्यात घालून ५ जणांनी एकाचा निर्घुण खून

अहमदनगर – मोबाईलवर व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तो आपलाच व्हिडीओ काढतोय असा गैरसमज करून घेत त्या रागात ५ जणांनी एकाचा सिमेंटचे ब्लॉक डोक्यात घालून निर्घुण खून केल्याची घटना एमआयडीसी जवळ असलेल्या सह्याद्री चौकात घडली आहे. स्टीफन अविनाश मिरपगार (वय ३३, रा. आंधळे-चौरे चौक, नवनागापूर) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ अल्पवयीन मुलांसह ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मयताची पत्नी काजल स्टीफन मिरपगार यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे पती स्टिफन हे सोमवारी (दि.४) मध्यरात्री पावणे एक वाजेच्या सुमारास सह्याद्री चौक येथील पान टपरी जवळ मोबाईलवर व्हिडीओ कॉलवर बोलत होते. त्यावेळी तेथे आरोपी संग्राम सोन्याबापू कदम (वय १९, रा. तलाठी कार्यालयाजवळ, नागापूर), किरण बाळासाहेब गव्हाणे, सोन्या उर्फ गौतम भगवान अंभोरे (दोघे रा. शनी शिंगणापूर, ता.नेवासा) यांच्यासह २ अल्पवयीन मुले असे ५ जण तेथे आले.

त्यावेळी स्टिफन हा त्यांचा व्हिडीओ मोबाईल मध्ये काढत असल्याचा गैरसमज करून घेत त्यांनी त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. थांब तुला आता दाखवतोच असे म्हणत त्यास काही वेळात ते ५ जण मारायला लागले असता तो जीव वाचविण्याच्या दृष्टीने पळू लागला. या ५ जणांनी त्याचा पाठलाग करत त्याच्या डोक्यात सिमेंटचे ब्लॉक फेकून मारले. त्यामुळे स्टिफन याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून तो बेशुद्ध झाला व काही वेळातच गतप्राण झाला.

मयत स्टिफन याची पत्नी काजल हिने सोमवारी (दि.१०) रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी ५ जणांच्या विरुद्ध भा. दं. वि. कलम ३०२, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झाल्यावर यातील आरोपी संग्राम सोन्याबापू कदम (वय १९, रा. तलाठी कार्यालयाजवळ, नागापूर) यास पोलिसांनी रात्री १० वाजता अटक केली आहे. पुढील तपास स.पो.नि. माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद परदेशी हे करत आहेत.

अगोदर वाटत होता अपघात, तपासातून समोर आला खून

मयत स्टिफन याचा मृतदेह ४ जून ला पहाटे सह्याद्री चौकात नगर मनमाड महामार्गा लगत आढळून आला होता. डोक्याला मार असल्याने प्रारंभी तो अपघात असावा असा सर्वांचा समज झाला. त्यामुळे पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र तेथे कुठल्याही वाहनाची धडक बसल्याचे तसेच त्याच्या जवळही वाहन नसल्याचे निदर्शनास आल्यावर स.पो.नि. माणिक चौधरी आणि पथकाने कुतुहला पोटी बारकाईने तपास सुरु केला. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. गोपनीय महिती काढल्यावर हा अपघात नव्हे तर घातपात (खून ) असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीही निष्पन्न केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles