Saturday, May 18, 2024

निलेश लंके यांची पोलिस प्रशासनाला धमकी… मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…

नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी पोलीस प्रशासनाला खुली धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. लंके यांनी पोलिसांवर केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना मंत्री विखे म्हणाले की, ‘साध्या माणसाचा खरा चेहरा’ आता लोकांसमोर येऊ लागला असून दहशत, गुंडगिरी अशी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार असा जोरदार शाब्दिक टोला मंत्री विखे यांनी नामोल्लेख टाळत निलेश लंके यांना लगावला.

माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातून पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी ८ वेळा संसदेत प्रतिनिधित्व केले. शिर्डी विधानसभा मतदार संघातील जनतेने मला ७ वेळा आमदार म्हणून निवडून दिले. हे पद्मश्रींनी दिलेल्या विचारांचे यश आहे. त्यांच्या संस्कारातच विखे परिवाराची अविरत वाटचाल सुरू असून सार्वजनिक जीवनात मिळालेली प्रत्येक संधी परिवाराने जिल्ह्याच्या विकासासाठी आणि सामान्य माणसाच्या उत्कर्षासाठी कारणी लावली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles