अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी गांधीनगर, कोपरगांव येथुन 24 तासात जेरबंद,
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 18/02/24 रोजी अल्पवयीन फिर्यादी ही कोपरगांव बसस्थानकात बसलेली असताना आरोपी नामे मोहसीन शेख याने तिचेकडे पाहुन अश्लील हावभाव केले व फिर्यादीचा पाठलाग करुन वाईट हेतूने तिचा हात धरुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले बाबत कोपरगांव शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 72/2024 भादविक 354, 354 (ड) सह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरची घटना संवेदनशिल असल्याने मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेवुन, आरोपी मिळुन आल्यास कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी दिनांक 18/02/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार बाळासाहेब मुळीक, रविंद्र कर्डीले, बाळासाहेब गुंजाळ व उमाकांत गावडे अशांचे पथक नेमुन फरार आरोपीचा शोध घेवुन, तो मिळुन आल्यास ताब्यात घेण्याच्या सुचना देवुन पथकास रवाना केले. पथक आरोपींचे वास्तव्याबाबत माहिती घेत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा आरोपी नामे मोहसिन शेख हा गांधीनगर, कोपरगांव येथे आला असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने प्राप्त माहिती स्थागुशा पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत पथकास आदेश दिले. पथकाने लागलीच गांधीनगर, ता. कोपरगांव येथे जावुन आरोपीचा शोध घेत असताना बातमीतील वर्णना प्रमाणे 1 संशयीत इसम पथकास दिसला त्यास ताब्यात घेण्याचे तयारीत असताना संशयीत इसम पोलीस पथकाची चाहुल लागताच पळुन जावु लागला. पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) मोहसिन रियाज शेख वय 34, रा. गांधीनगर, कोपरगांव असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची सांगितल्याने त्यास कोपरगांव शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास कोपरगांव पोलीस स्टेशन करत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व मा. श्री. शिरीष वमने साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.