Monday, March 4, 2024

नगरसह कर्जत तालुक्यात चार लाखांची दारू जप्त…८ जणांवर गुन्हा दाखल

मिरजगांव, कर्जत व नगर तालुका पोलीस स्टेशन हद्यीत हॉटेलवर विनापरवाना देशी विदेशी दारु विक्री करणारे व गावठी हातभट्टी दारु तयार करणारे 08 आरोपी विरुध्द कारवाई करुन 4,18,665/- रुपये किंमतीची दारु जप्त,
स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई

मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सफौ. भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/अतुल लोटके, गणेश भिंगारदे, पोकॉ/सागर ससाणे, रोहित मिसाळ, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, जालींदर माने, चापोकॉ/अरुण मोरे यांचे स्वतंत्र दोन पथके नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी मिरजगांव, कर्जत व नगर तालुका पोलीस स्टेशन हद्यीमध्ये दिनांक 23/01/2024 रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवून 08 ठिकाणी छापे टाकुन एकुण 4,18,665 रुपये किंमतीचा मुद्येमाल त्यामध्ये 2,68,665/- रुपये किमतीची देशी विदेशी, गावठी हातभट्टीची दारु, रसायन व 1,50,000/- रुपये किमतीची इंडिका कार जप्त करुन खालील प्रमाणे 08 आरोपीं विरुध्द मिरजगांव, कर्जत व नगर तालुका पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकुण- 8 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

अ.नं. पोलीस ठाणे गुरनं व कलम आरोपीचे नांव जप्त मुद्येमाल
1. मिरजगांव पो. ठाणे गु.र.नं. 25/2024 महाराष्ट्र दारुबंदी कायदा क. 65 (ई) शरद श्रीमंत नालकोल रा. नालकोल, ता. आष्टी, जि बीड 11,975/- रुपये किमतीची देशी विदेशी दारु
2. मिरजगांव पो. ठाणे गु.र.नं. 26/2024 महाराष्ट्र दारुबंदी कायदा क. 65 (ई) शंकर श्रीपती कोरडे रा. तिखी, ता. कर्जत, जि. अहमदनगर 2100/- रुपये किमतीची देशी दारु
3. मिरजगांव पो. ठाणे गु.र.नं. 27/2024 महाराष्ट्र दारुबंदी कायदा क. 65 (ई) सुधीर अंबादास मिंड रा. खुरंगेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर 10,545/- रुपये किमतीची देशी विदेशी दारु
4 मिरजगांव पो. ठाणे गु.र.नं. 28/2024 महाराष्ट्र दारुबंदी कायदा क. 65 (ई) तुकाराम नंदराम लामटोळे रा. चांदे बु, ता. कर्जत, जि. अहमदनगर 2,20,360/- रुपये किमतीची देशी विदेशी दारु व त्यामध्ये 1,50,000/- रुपये किमतीची इंडिका कार
5 कर्जत पो. ठाणे गु.र.नं. 32/2024 महाराष्ट्र दारुबंदी कायदा क. 65 (ई) विठ्ठल जालींदर गोंजारे रा. बर्गेवाडी, कर्जत, जि. अहमदनगर 4200/- रुपये किमतीची विदेशी दारु
6 कर्जत पो. ठाणे गु.र.नं. 33/2024 महाराष्ट्र दारुबंदी कायदा क. 65 (ई)
रामदास महादु नेटके रा. भांडेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर 1,34,485/- रुपये किमतीची विदेशी दारु
7 नगर तालुका पो. ठाणे गु.र.नं. 39/2024 महाराष्ट्र दारुबंदी कायदा क. 65 (ई) गोरख अर्जुन गव्हाणे रा. वाळुंज, ता. जि. अहमदनगर 23,000/- रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारु व रसायन
8 नगर तालुका पो. ठाणे गु.र.नं. 40/2024 महाराष्ट्र दारुबंदी कायदा क. 65 (ई) कानिफनाथ भिमाजी कळमकर रा. नेप्ती शिवार, ता. जि. अहमदनगर 12,000/- रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारु व रसायन
एकुण 08 आरोपी
4,18,665 /- रु.कि.ची देशी विदेशी दारु, गावठी हातभट्टीची तयार दारु, रसायन व 1,50,000/- रुपये किमतीची इंडिका कार

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. विवेकानंद वाखारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग कर्जत, मा. श्री संपत भोसले साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles