नगर: राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या नगर जिल्ह्यात निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांसाठी जोरदार चढाओढ सुरू झाली आहे. दक्षिणेच्या जागेसाठी जास्तच राजकारण पाहण्यास मिळत आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आमदार शंकरराव गडाख तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून आ. रोहित पवार आणि आ. प्राजक्त तनपुरे यांची नावे पुढे केली जात आहेत. यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंकेंनी यांनीही उडी घेतली आहे. राणी लंके यांनी स्वतः नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘लोकसभेला समोर कुणीही उमेदवार असला तरी त्याचे आम्हाला काही घेणे देणे नाही. मात्र मी जनतेच्या विकासासाठी लोकसभा निवडणूक लढणार आहे’, असे राणी लंके म्हणाल्या.भाजप आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट हा महायुतीत सत्तेत आहे. मात्र तरी देखील कधी निलेश लंके तर कधी राणी लंके यांच्या लोकसभा उमेदवारीची चर्चा होत असते. मात्र आता खुद्द राणी लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर सांगितले आहे. लोकसभेला समोर कुणीही उमेदवार असला तरी त्याचे आम्हाला काही घेणे देणे नाही. मात्र मी जनतेच्या विकासासाठी लोकसभा निवडणूक लढणार आहे, असे राणी लंके म्हणाल्या.