आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून बोल्हेगाव परिसरात औषध व धूर फवारणी
मा.सभापती कुमार सिंह वाकळे यांची माहिती
नगर : पावसाळ्यात उद्भवणारे डेंग्यू, चिकनगुनिया, गोचीडताप इत्यादी आजार रोखण्यासाठी प्रभाग क्र. ७ – बोल्हेगाव परिसरात आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून डास प्रतिबंधक औषध व धूर फवारणी करण्यात येत असल्याची माहिती महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी दिली.
पावसाळ्यात पोषक वातावरण तयार झाल्यामुळे डासांचे प्रमाण वाढून विषाणूजन्य आजारांचा प्रसार होतो. त्यामुळे डास उत्पत्ती होणारी स्थाने नष्ट करून त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी स्वतःची यंत्रणा उभारत शहरात ठीकठिकाणी डास प्रतिबंधक औषध व धूर फवारणी सुरू केली आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक ७ मध्ये नुकत्याच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. जेणेकरून नागरिकांचे आरोग्य सदृढ निरोगी राहण्यास मदत होईल. महागड्या आरोग्य सेवेमुळे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आर्थिक परिस्थितीमुळे आजारी पडल्यानंतर आजारपण आपल्या अंगावरच काढत असतात, यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी मदत करावी, बोल्हेगाव येथे मनपाचे आरोग्य केंद्र सुरू झाले, असून या परिसरातील नागरिकांना मोफत प्राथमिक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिले असल्याची माहिती माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी दिली. यावेळी संतोष ढाकणे, दिलीप राख, किशोर नलगे, विलास भिंगारदिवे, नवनाथ कोलते, नवनाथ वाकळे, पवन चाफे, रंगनाथ गवळी, सुरज कोलते, योगेश भोसले, पांडुरंग कदम, सुरेश अडसूळ, संतोष वाटमोडे, पंकज वाकळे, शेख हबीब, नयन ससे, श्याम वाकळे, दशरथ वाकळे, रावसाहेब वाटमोडे, शंकर वाटमोडे, गोरख वाटमोडे, शिवाजी कराळे, करण वाकळे, रमेश वाकळे, आकाश वायकर, सचिन कदम, पंकज लोखंडे, अंबिका घोलप, सचिन शेकटकर, अक्षय दुधाळ, विलास जाधव, संदीप कापडे, संदेश वाटमोडे, सावळेराम कापडे, तुषार सोनवणे, अतुल देठे, अरुण थिटे, ज्ञानदेव कापडे, बाळासाहेब धीवर, नवनाथ भोर आदीसह नागरिक उपस्थित होते.