एकविरा चौक ते तपोवन रोड, जुना पिंपळगाव रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न
नगर : आपण नुकताच 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे, एवढ्या वर्षांमध्ये नगर शहराच्या विकास कामासाठी इतिहासात पहिल्यांदाच १५० कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे या कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दरवाजा वाजवला आणि त्यांनी तो उघडला व तो निधी नगर पर्यंत आला या माध्यमातून विकासाचा झंजावत सुरू झाला, यामध्ये नगरकरही मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत, रस्ता हा पूर्वी दुर्लक्षित होता या ठिकाणी अनेक पुढाऱ्यांनी नारळ फोडली, मात्र त्या रस्त्याचे काम मीच पूर्ण केले, त्यामुळे नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहे, तपोवन रस्ता हा बाजारपेठ म्हणून ओळखला जाईल रस्त्यांची जाळे निर्माण केल्यानंतर व्यापारीकरण व रोजगार निर्मिती होत असते,डीपी रस्त्यांच्या विकास कामांबरोबर अंतर्गत रस्त्यांची कामे देखील हाती घेतली आहे या कामासाठी शासनाकडून 44 कोटी रुपये मंजूर करून आणले आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले एकविरा चौक ते तपोवन रोड जुना पिंपळगाव रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, निखिल वारे, माजी नगरसेविका दिपाली बारस्कर, मीनाताई चव्हाण, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, डॉ. सागर बोरुडे, सुनील त्रिंबके अदीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपत बारस्कर म्हणाले की, सावेडी उपनगराच्या विकासाला आ. संग्राम जगताप यांनी मोठा निधी मंजूर करून दिला असल्यामुळे गती प्राप्त झाली आहे, तपोवन रोड, एकविरा चौक, पारिजात चौक ते टेलिफोन ऑफिस पर्यंत रस्त्याचे काम मंजूर असून पहिल्या टप्प्यात तपोवन रोड ते एकविरा चौकापर्यंत पूर्ण होणार आहे, याचबरोबर तलाठी कार्यालय ते राजनंदिनी हॉटेलपर्यंतचा रस्ता देखील पूर्ण होणार आहे, पाऊलबुद्धे शाळा ते सिटी प्राईड हॉटेल पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याचे काम मार्गी लागणार आहे, लवकरात लवकर विकासाची कामे पूर्ण व्हावी यासाठी रात्रंदिवस काम चालणार आहेत तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
राज्य सरकारच्या माध्यमातून नगर शहरातील विविध भागातील रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला असून या कामाच्या भूमिपूजनासाठी गेल्यावरती नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकासाचे वाजत गाजत स्वागत करत फटाक्याची आतिषबाजी केली जाते, नागरिकांचे असलेले प्रेम पाहून मनाला समाधान वाटते, नागरिकांनी दिलेल्या संधीचे मी सोने करू शकलो व विकास कामातून नागरिकांचा विश्वास संपादन केला असल्याचे मत आमदार संग्राम यांनी व्यक्त केले