बोल्हेगाव येथे मनपा मा. स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले.
शहराचा विकास कामातून बॅकलॉग भरून काढला – आ.संग्राम जगताप
नगर – शहराचे नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत होत असताना विविध विकास कामासाठी शासनाचे विशेष पॅकेज मिळत असते. मात्र आपल्या शहराला एक रुपये मिळाला नाही त्या काळातील लोक प्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे होते. त्यामुळे आपल्याला मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे करावी लागत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणून शहर विकासाचा बॅकलॉग भरून काढला आहे. एक-एक प्रश्न हाती घेऊन नियोजनबद्ध व कायमस्वरूपी ची विकासाची कामे मार्गी लावले जात आहे. शहरात 35 हजार पथदिवे बसविण्याचे काम केले याचबरोबर कचराकुंडी मुक्त शहर निर्माण केले नगरकरांना आरोग्याच्या सुविधा कमी खर्चात मिळाव्या यासाठी बुरुडगाव रोड येथे जिजामाता हॉस्पिटलची निर्मिती होत आहे. विकास कामांची स्पर्धा केली पाहिजे यामध्ये मा.सभापती कुमारसिंह वाकळे आघाडीवर राहतील त्यामुळे बोल्हेगाव चा विकास कामातून बदल झाला आहे. आता बोल्हेगाव येथील नागरिकांना प्राथमिक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले. बोल्हेगाव येथे मनपा स्थायी समितीचे मा.सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी मा.सभापती कुमारसिंह वाकळे, आयुक्त यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, मा,नगरसेवक राजेश कातोरे, विपुल शेटिया, डॉ.कविता माने,रमेश वाकळे, साहेबराव सप्रे, रावसाहेब वाटमोडे, दत्तात्रेय वाकळे, अरुण ससे, किसन कोलते,दिलीप वाकळे,हरिदास आरडे, भालचंद्र भाकरे,ज्ञानदेव कापडे, डॉ,अपूर्वा वाळकेआदींसह उपस्थित होते.
मा.सभापती कुमारसिंह वाकळे म्हणाले की, शासनाचे ऑफिस दवाखाने गावांमध्ये असणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून नागरिकांना तातडीने सुविधा उपलब्ध होत असतात. महापालिकेच्या माध्यमातून बोल्हेगाव येथे आयुष्यमान आरोग्य मंदिर सुरू झाले आहे. या ठिकाणी नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा मिळणार आहे. आता नगर शहरामध्ये आ.संग्राम जगताप यांच्या विकासाची लाट आली आहे. प्रत्येक कॉलनी,वार्डात विकासाचे काम सुरू असून माझ्या वार्डात 100 पेक्षा जास्त रस्त्याची कामे पूर्ण झाली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये शहरांमधील प्रमुख रस्त्यांची कामे मार्गी लागली आहे. नागरिकांचा विकास नागरिकांच्या च हातामध्ये असतो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार दिला असून चांगल्या व्यक्तीला निवडून द्यायचे आहे असे ते म्हणाले.
आ.संग्राम जगताप हाच आमचा पक्ष असून तुम्ही कोणतेही चिन्ह घ्या आम्ही काम करू कारण शहराच्या विकासासाठी आ. संग्राम जगताप यांची खरी गरज आहे विधानसभा लढवणे कोणत्या लुंग्या-सुंग्याचे काम नाही शहरातील सात ते आठ भावी आमदार म्हणून मिरवत आहे. त्यांनी आधी आमच्याबरोबर नगरसेवकाची निवडणूक करावी त्यांचा तिथेच आम्ही पराभव करू कारण त्यांनी समाजासाठी काय केले आहे. एखादे तरी काम दाखवावे त्यांचे कर्तृत्व शून्य आहे. आमदार संग्राम जगताप हे समाजामध्ये विकासाबरोबर सुख दुःखामध्ये सामील होणारे नेतृत्व आहे. मागची पंचवीस वर्ष आणि आत्ताची दहा वर्ष यामध्ये खूप फरक आहे आता निधीसाठी नगरसेवकांमध्ये चढाओढ लागते असे मत स्थायी समितीचे मा.सभापती कुमारसिंहवाकळे यांनी केले
नगर शहरामध्ये शासनाच्या माध्यमातून विविध भागात 18 दवाखाने तयार होत असून नागरिकांच्या घरापर्यंत आरोग्याच्या सुविधा घेऊन जाण्याचे काम केले जात आहे. बोल्हेगाव येथे आयुष्यमान आरोग्य केंद्र सुरू झाले आहे आपले आरोग्य सदृढ निरोगी राहावे यासाठी नागरिकांनी व्यायाम व चांगला आहार घ्यावा तरी नागरिकांनी आरोग्य केंद्राचा लाभ घ्यावा असे आव्हान आयुक्त यशवंत डांगे यांनी केले