Monday, September 16, 2024

नगर शहरात राज्य सरकारच्या माध्यमातून इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा निधी, नगरकर करताहेत स्वागत

आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून लालटाकी, न्यू आर्ट्स कॉलेज, दिल्ली गेट पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे यांच्या हस्ते संपन्न झाले

रस्त्याची कामे होईपर्यंत थोड्या दिवस त्रास सहन करा मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो – आ. संग्राम जगताप

नगर शहरात रस्त्यांची कामे सुरू झाली असून पूर्ण होईपर्यंत काही दिवस नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागेल, कॉंक्रिटीकरण्याची रस्त्याची कामे असल्यामुळे ती नियोजनबद्ध व दर्जेदार व्हावीत यासाठी खोदाई केली जाईल व दोन्ही बाजूंनी पावसाचे पाणी व ड्रेनेज वाहून जाण्यासाठी आरसीसी गटात तयार करण्यात येणार आहे यामुळे नागरिकांना थोडासा त्रास होईल मात्र पुढे कायमस्वरूपीचा त्रास बंद होणार आहे यापूर्वी अनेक वर्ष रस्त्यांच्या समस्येमुळे शहरवासीयांनी त्रास सहन केला आहे रस्त्याची कामे होईपर्यंत थोड्या दिवस सहन करा मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो, विकास कामांमध्ये नगरकर मोठ्या संख्येने सहभागी होत असून विकासाची कामे पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिपादन केले
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून लालटाकी, न्यू आर्ट्स कॉलेज, दिल्ली गेट पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आ.संग्राम जगताप, मा.नगरसेवक धनंजय जाधव, अमोल गाडे, प्राध्यापक अरविंद शिंदे, युवराज शिंदे, अनिल शेकटकर, अजय साळवे, डॉ.अभिजीत पाठक, प्राचार्य सागडे सर प्राचार्य तांबे सर, सुरज जाधव, सारंग पंधाडे, अंकुश मोहिते, पोपट पाथरे, शिवाजी साबळे, रवी दंडी, बाळकृष्ण जगधने, नितीन मरकड, यशवंत तोडमल, सनी कांबळे, सचिन भुतारे, बजरंग भूतारे, हरिभाऊ येलदंडी, चेतन अर्कल, परेश पुरोहित, आनंद पुंड, मदन पुरोहित, अनमल वाडेकर आदी उपस्थित होते
(चौकट) राज्य सरकारच्या माध्यमातून शहर विकासासाठी एवढा मोठा निधी पहिल्यांदाच मिळाला असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहे. यानिमित्त भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त फिरत असताना नगरकर विकास कामांचे स्वागत करताना दिसत आहे त्यामुळे केलेल्या कामाचे समाधान मिळत असून या माध्यमातून ऊर्जा व प्रोत्साहन मिळते व अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते असे मत आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले
नगरकरांच्या सहकार्यामुळे विषाणूजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यात यश : आयुक्त यशवंत डांगे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles