उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी पडली असून, अशा परिस्थितीत आपण कोणत्या बाजुला, याबाबत गोल गोल भूमिका जाहीर करणारे नगरचे आमदार संग्राम जगताप आणि पारनेरचे आमदार नीलेश लंके अखेर अजित पवार गटाकडे गेले असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.
आ. संग्राम जगताप पूर्वीपासूनच अजित पवार समर्थक म्हणून ओळखले जात असल्याने ते अजित पवार यांच्याच गोटात आजही दिसले.
नगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या सोबत तर नगर शहर राष्ट्रवादी अजित पवार गटात सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.