Tuesday, April 29, 2025

शहरातील मालमत्ताधारकांसाठी आ.संग्राम जगताप यांची मनपाकडे विशेष मागणी

शहरातील सर्वच करदात्यांना 75 टक्के शास्ती माफी द्यावी

आमदार संग्राम जगताप यांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

नगर – अहमदनगर महानगरपालिकेचा कर मोठ्या प्रमाणात थकीत असून महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे शहरातील मुलभूत प्रश्नांबरोबरच विकास कामे करताना अडचणींना सामोरे जावे लागते. शहरातील करदाते शास्ती माफी भरण्यास तयार आहेत. मात्र आयुक्त यांनी फक्त 50,000 रु./- करदात्यांना शास्ती माफीचा लाभ दिला आहे. तरी आयुक्त यांनी तातडीने शहरातील सर्वच करदात्यांना 75 टक्के शास्ती माफीचा लाभ तातडीने द्यावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी निवेदनाद्वारे आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्याकडे केली आहे.
शहरातील अनेक करदात्यांनी माझ्याशी संपर्क साधला असून मनपाने फक्त 50,000 रु./- वरच शास्ती माफी दिली आहे. तरी सर्वच करदात्यांना 75 टक्के शास्ती माफीचा लाभ मिळाल्यास करदाते मोठ्या प्रमाणात कर भरतील, नागरिक महानगरपालिकेचा जो मालमत्ता कर आकारते ते भरण्यास तयार आहेत. पण काही आर्थिक अडचणीमुळे अनेक करदाते कर भरु शकत नाही. यामुळे या नागरिकांच्या मालमत्ता करामध्ये अतिरिक्त दंड (शास्ती कर) लागलेला आहे. जर ही शास्ती आपल्या अधिकारात 75 टक्के सुट दिल्यास अनेक करदाते उस्फुर्तपणेेे थकबाकी भरण्यास तयार होतील, यामुळे थोड्याफार प्रमाणात महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. यातून विकास कामांसाठी ही निधी उपलब्ध करता येईल. तरी तातडीने शहरातील करदात्यांना 75 टक्के शास्ती माफीचा लाभ द्यावा, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles