Friday, February 23, 2024

मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरविण्याची कारवाई करावी, मनसेचे निवेदन

नगर – मशिदीवरील अनाधिकृत भोंगे उतरवणे व ध्वनीक्षेप क्षमता तपासून कारवाई करण्यात यावी, या मागणी मागणीने निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक यांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, महिला शहराध्यक्षा अ‍ॅड.अनिता दिघे, शहर सचिव डॉ.संतोष साळवे, वाहतुक सेना शहराध्यक्ष अशोक दातरंगे, शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे, दिपक दांगट, संतोष व्यवहारे, मंगेश चव्हाण, विभाग अध्यक्ष किरण रोकडे, प्राची वाकडे, प्रमोद ठाकूर, प्रकाश गायकवाड आदि उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, मागील काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र नवनिमाण सेनेने मशिदीवरील अनाधिकृत भोंगे उतरवून कारवाई करण्याबाबत आपणास निवेदन दिले होते, त्यावेळेस आपण केलेल्या कारवाईमुळे काही काळापुरता भोंग्यांचा आवाज कमी झाला होता, परंतु आता पुन्हा मशिदीवर अनाधिकृत भोंगे लावण्यात आले आहेत. याबाबतच्या तक्रारी संपूर्ण नगर शहरातील नागरिकांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकार्‍यांकडे येत आहेत.

धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध, रुग्ण, अशक्त व्यक्ती, लहान मुले आणि विद्यार्थी यांना भोंग्याच्या कर्कश्य आवाजामुळे होणार्‍या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे, त्या निर्णयात स्पष्ट सांगितले आहे की, रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कुठलाही ध्वनीक्षेप वापरता येणार नाही. प्रत्येक धर्मियांच्या सणांना तेवढ्याच दिवसापुर्ती ध्वनिक्षेप लावण्याची परवानगी मिळेल, परंतु 365 दिवस परवानगी मिळणार नाही, ध्वनिक्षेपाची परवानगी रोज घ्यावी लागेल.

ध्देशातील सर्व धमियांना ध्वनीक्षेपामुळे होणार्‍या ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो, मुळात हा विषय धर्मिक नसून सामाजिक आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही आपल्या पोलिस प्रशासनाची असून, संपूर्ण नगर शहरातील सर्व मशिदीवरील अनाधिकृत भोंग्यावर कारवाई करुन आपला पोलिस खाक्या दाखवावा आणि शहरात कायद्याचे राज्य आहे, हे त्यांनी दाखवून द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles