Sunday, July 21, 2024

नगरमध्ये 16 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्वात मोठे महा रक्तदान शिबीर

अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे आयोजन

नगर : माणुसकीचे नाते जोडणारे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे असे म्हणतात. अत्यवस्थ रूग्ण, थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना एखाद्याने केलेले रक्तदानच जीवदान देणारे ठरते. रक्तदानाची ही चळवळ समाजात खोलवर रूजण्यासाठी अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नगर जिल्ह्याच्या इतिहासातील विक्रमी रक्त पिशव्या संकलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मंगळवार दि.16 जुलै 2024 रोजी सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत न्यू टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे सदर शिबीर होणार आहे, अशी माहिती ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप व अहमदनगर जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी दिली.

या महा रक्तदान शिबीरासाठी संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशन, आय लव्ह नगर, ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे सहकार्य लाभले आहे. नगरमधील दहा रक्तपेढींची टिम शिबिरात रक्त संकलनाचे काम पाहणार आहे.

या उपक्रमाचे स्वागत करताना आ.संग्रामभैय्या जगताप म्हणाले, अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जपत 2022 मध्ये महा रक्तदान शिबिर घेवून विक्रमी रक्त संकलन केले होते. यावर्षी देखील असाच विक्रमी रक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे. रक्तदान चळवळ ही काळाची गरज आहे. एखाद्याने स्वेच्छेने केलेले रक्तदान गरजू रूग्णांसाठी वरदान ठरते. अनेक आजारात रक्त घटकांचीही आवश्यकता असते. विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी कृत्रिम रक्त निर्मिती शक्य झालेली नाही. अशावेळी माणसाने माणसासाठी केलेले रक्तदानच महत्वाचे असते. रक्तदानामुळे रक्तदात्याचे आरोग्यही चांगले राहते हे संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे नगरचे हे महा रक्तदान शिबीर महाराष्ट्राच्या नकाशावर येईल यासाठी जास्तीत जास्त नगरकरांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन आ.संग्रामभैय्या जगताप यांनी केले आहे.

आय लव्ह नगरचे संस्थापक नरेंद्रजी फिरोदिया म्हणाले, रक्तदान हा अतिशय महत्वाचा विषय आहे. जसे आपण म्हणतो अन्नदान हे श्रेष्ठ दान तसेच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. नगरकर सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असतात. रक्तदान चळवळ नगरकरांनी पुढे नेलेली आहे. त्यामुळे आताच्या महा रक्तदान शिबीरातही नगरकरांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून रक्तदानाचे पवित्र कार्य करावे, असे आवाहन फिरोदिया यांनी केले आहे.

अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने नेहमीच सामाजिक कार्यात योगदान दिलेले आहे. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी असोसिएशनने तीन लाख रुपयांचा कृतज्ञता निधी दिला होता. कोल्हापूर, सांगली येथील महापुरावेळी मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तू इतर आवश्यक साहित्य पाठविण्यात आले होते. गोरगरीब रूग्णांना शस्त्रक्रिया, आरोग्य उपचारांसाठी वेळोवेळी मदत केली जाते. व्यवसाय करतानाच आपण ज्या समाजामुळे मोठे होतो, त्या समाजाप्रती बांधिलकी जपण्याचा प्रयत्न असोसिएशनचे सर्व सदस्य प्रत्यक्षात आणतात. यावेळीही आणखी विक्रमी संख्येने रक्त पिशव्या संकलन करण्याचे नियोजन असून या शिबिराला नगरकरांनी मोठा प्रतिसाद द्यावा व एका पवित्र कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन असोसिएशनच्या वतीने कोअर कमिटी सदस्य अमित बुरा, रितेश सोनीमंडलेचा, साजीद खान, प्रितम तोडकर, राकेश सोनीमंडलेचा, हिराशेठ खुबचंदानी, मनोज बरलोटा, संतोष बलदोटा, गोरख पडोळे, मनिष चोपडा, अतुल रच्चा आदींनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles