नगर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या मंचावरील अनेक नेत्यांनी देखील मला मदत केली, मात्र आता त्यांचं नाव घेणे योग्य ठरणार नाही असं म्हणत नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी गौप्यस्फोट केला. तसेच आता दिल्लीला जाऊन इंग्रजीत भाषण करणार आहे. शरद पवार मला दिल्ली शिकवणार असल्याचे निलेश लंके म्हणाले. विजयानंतर ते नगरमध्ये माध्यमांशी बोलत होत.
निलेश लंके म्हणाले, विजयानंतर पक्षाचे नेते शरद पवार यांच्यासोबत माझं फोनवरून बोलणं झाले आहे. मी त्यांना भेटण्यासाठी कधी येऊ विचारले असता ते दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितल. तसेच त्यांनी मला दिल्ली शिकवतो असं म्हटलं आहे.आता दिल्लीत जाऊन इंग्रजीत भाषण देखील करणार आहे.
हा विजय माझा नसून जनतेचा विजय आहे. भाजपच्या स्टेजवर उभे राहूनही मला मदत करणाऱ्या त्या सर्व अदृश्य शक्तीचाही हा विजय असल्याचं यावेळी त्यांनी सांगितले. सोबतच आता कुणाबद्दलही काहीही बोलायचे नाही असं निलेश लंके यांनी म्हटले आहे.