आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे यांनी राज्याच्या दौऱ्यास नगरमधून आज, मंगळवारपासून सुरुवात केली. नगरमधील आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सूतोवाच केले. महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार संग्राम जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीचा कोणीही आमदार त्यांच्या संपर्कात नाही, केवळ दिशाभूल केली जात आहे. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले की, रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष होण्याची घाई झाली आहे. त्यांना स्वत:च्या स्थानाची काळजी वाटते, परंतु पक्षात काही बोलता येत नसल्याने ते लक्ष वेधून घेत आहेत.