नगर दक्षिण मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. खा.डॉ.सुजय विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव कर्डिले विविध कार्यक्रमाच्या निमित्त मतदारसंघात जनतेशी संवाद साधत आहेत. या दौऱ्यावेळचा एक व्हिडिओ खा.विखे यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. व्हिडिओत खा.विखे तसेच शिवाजीराव कर्डिले हे एका भिंतीवर पेंटिंग करताना दिसतायत. बार बार मोदी सरकार असा मजकूर भिंतीवर लिहिण्यात येत होता. पेंटरला साथ देत विखे व कर्डिले दोघांनीही पेटिंग करण्याचा आनंद लुटला.
खा.विखे, माजी आ.कर्डिलेंनी भिंतीवर केलं पेटिंग….बार बार मोदी सरकार..व्हिडिओ
- Advertisement -