मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना उच्च न्यायालयात अखेर जामीन मंजूर.
आंबेडकरी समाजाच्या वतीने महापालिकेसमोर फटाके वाजून जल्लोष.
अहमदनगर (प्रतिनिधी)- महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचा आज औरंगाबाद उच्च न्यायालय मध्ये जामीन मंजूर झाला असून समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने अहमदनगर महानगरपालिकेसमोर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, पी आर पी जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, आर पी आय उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, कौशल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, गणेश गायकवाड, निखिल साळवे, विकास साळवे, आर पी आय शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे सुरेश बनसोडे म्हणाले की, जे काही जातीयवादी मनुवादी लोकांनी खोट्या गुन्ह्यात अडकून आयुक्त यांना अडकवण्याचा प्रयत्न केला त्यांना कोर्टाने चपराक दिली असून असे खोटे प्रकार चालत नाही. व अहमदनगर शहरामध्ये शिस्तप्रिय कार्य करणारे अधिकाऱ्याला न्यायालयाने न्याय दिला असल्याचे सांगितले व सुमेध गायकवाड म्हणाले की, आंबेडकरी जनता व समाज आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्या पाठीशी आजही आहे व उद्याही राहणार असून अशा खोट्या गुन्हा दाखल करण्यास जो कोणी खतपाणी घालत असेल त्यालाही आंबेडकरी समाजाच्या वतीने उत्तर देणार असल्याचे सांगितले व अजय साळवे म्हणाले की, ज्या जातीय मानसिकतेतून ट्रॅप लावण्यात आला होता तो खोटा असल्याचा सिद्ध झाला व विजय हा सत्याचा असतो व अहमदनगर महानगरपालिकेत डॉ.पंकज जावळे यांना पुन्हा नियुक्त करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे
मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना अखेर जामीन मंजूर, महापालिकेसमोर फटाके वाजून जल्लोष….
- Advertisement -