Friday, February 23, 2024

अहमदनगर मनपा आयुक्त डॉ, पंकज जावळे करणार ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाई

अहमदनगर : महानगरपालिकेच्या सावेडी प्रभाग कार्यालयाला आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी अचानक भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या वर्कशीटची तपासणी केली, त्याचबरोबर सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली, प्रभाग अधिकारी उमाप यांच्याकडून कामचुकार कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले, सर्वच कर्मचाऱ्यांचे वर्कशीट तपासणी मोहीम सुरू करावी असे आदेश आस्थापन विभाग प्रमुख मेहेर लहारे यांना दिले, ज्या नागरिकांची कर वसुली झाली नाही त्यावर जप्ती केली असणाऱ्या मालमत्तेवर बोजा चढून निलाव प्रक्रिया राबवावी तसेच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून त्याचे साहित्य वाळू, वीट, खडी रस्त्यावर टाकली जात आहे, अधिकारी कर्मचारी यांच्याकडून कामकाजात हलगर्जीपणा झाल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिला.
अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सावेडी प्रभाग कार्यालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी आस्थापन विभाग प्रमुख मेहर लहारे उपस्थित होते.

आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सावडी प्रभाग कार्यालयाची पाहणी केली असता ठिकठिकाणी अस्वच्छता दिसली त्यामुळे त्यांनी प्रभाग अधिकारी यांना नोटीस काढण्यात यावी तसेच उद्या सकाळी सर्व कर्मचाऱ्यांनी सात वाजता कार्यालयात उपस्थित राहून स्वच्छता मोहीम राबवावी असा आदेश आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी यावेळी दिला,

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles