नगर शहरात सुरू असलेल्या रस्ता कॉंक्रिटीकरण कामाची आयुक्त यशवंत डांगे यांनी केली पाहणी
शहराचा शाश्वत विकास होण्यासाठी पुढील 25 वर्षाचे नियोजन करून रस्त्याची निर्मिती होत आहे – आयुक्त यशवंत डांगे
नगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने राज्यस्तरीय नगर उत्थान महाअभियान योजनेतून आपण शहरांमधील प्रमुख 24 रस्त्यांची कामे हाती घेतली असून या कामातील सिमेंट काँक्रीट चा दर्जा हा M-40 ग्रेडचा असून शहरातील ५ कॉंक्रिटीकरण रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे ती प्रगती पथावर चालू आहे यामध्ये माऊली संकुल ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत तसेच लालटाकी ते दिल्लीगेट आणि बागरोजा हडको पर्यंत रस्त्याच्या कामाची पाहणी केली या सर्व रस्त्यांची डिझाईन चिफ इंजिनिअर मुख्य अभियंता बांधकाम विभाग यांनी प्रमाणित केले असून त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे, नगर शहराचा शाश्वत विकास व्हावा यासाठी पुढील 20 ते 25 वर्षाचे नियोजन करून दर्जेदार व कायम स्वरूपीच्या रस्त्याची निर्मिती होत आहे. रस्त्यांची कामे सुरू केले असल्यामुळे वाहतूक वळविण्यात आली असून काही प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत आहे, तसेच खोदकामामुळे ड्रेनेज व पाणी लाईन फुटल्यामुळे देखील त्रास होत असेल यासाठी तातडीने दुरुस्ती करून पूर्ववत करण्याच्या सूचना यावेळी दिल्या आहे, आता थोडाफार त्रास होत असेल मात्र आपण सर्वजण मिळून पुढच्या नगरच्या भविष्यासाठी काम करूया, यासाठी नगरकरांनी सहकार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.
नगर शहरात सुरू असलेल्या रस्ता कॉंक्रिटीकरण कामाची आयुक्त यशवंत डांगे यांनी पाहणी केली यावेळी शहर अभियंता मनोज पारखे, इंजिनियर श्रीकांत निंबाळकर आदीसह अधिकारी, ठेकेदार, कर्मचारी उपस्थित होते.
मनपा आयुक्त यशवंत डांगे दररोज सकाळी नगर शहरामध्ये दैनंदिन कामाची पाहणी करत असताना कुष्ठधाम नाल्याजवळ उघड्यावर कचरा टाकण्यासाठी आलेल्या नागरिकाला स्वच्छतेबाबत खडेबोल सुनावत सावेडी डेपोत कचरा टाकण्यास भाग पाडले, तसेच गजराज फॅक्टरी समोर विनापरवाना बांधकाम चालू असल्याचे आढळले त्या ठिकाणी फॅब्रिकेटरचे साहित्य जप्त करून महापालिकेने कारवाई केली, याचबरोबर कुष्ठधाम रोडवरील नाल्याची झालेली दुरावस्था बघून त्वरित साफसफाई करण्याचे आदेश विभागाला दिले अशा धडाकेबाज कारवाईच्या माध्यमातून आयुक्त यशवंत डांगे शहराची प्रतिमा सुधारण्याचे काम जोमाने करत आहे याबद्दल नागरिकांमधून त्यांचे कौतुक देखील होत आहे