Monday, March 17, 2025

नगर महानगरपालिकेचा आयुक्त तथा प्रशासक पंकज जावळे सह पीए ‘एसिबिच्या’ जाळ्यात

एसीबीच्या कारवाईची कुणकुण लागल्यानंतर पालिका आयुक्त आणि लिपिक हे दोघेही फरार झाले आहेत.

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिपिक शेखर देशपांडेच्या बुऱ्हाण नगरमधील घरावर एसीबीकडून छापा टाकण्यात आला आहे. तर आयुक्ताचं राहतं घर लाचलुचपत विभागानं सील केलं आहे.
दिनांक- 27/06/2024

युनिट – *अँटी करप्शन ब्युरो ,जालना
तक्रारदार – पुरुष, वय 41 वर्षे

आलोसे-
1. डॉ. पंकज जावळे
वय- 47 वर्षे, पद- आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका, अहमदनगर ( वर्ग -1 ) मूळ रा.माजलगाव जि.बीड
सध्या राहणार – शासकीय निवासस्थान ,अहमदनगर.
2. श्रीधर देशपांडे
वय- 48 वर्षे, पद- लिपिक टंकलेखक अतिरिक्‍त पदभार स्विय सहायक आयुक्त महानगरपालिका, अहमदनगर ( वर्ग – 3 )
रा.अहमदनगर

➡ लाच मागणी पडताळणी :-
1. दि. 19/06/2024
2. दि. 20/06/2024

➡ लाच मागणी रक्कम-
9,30,000/-रुपये तडजोडी अंति 8,00,000/-रुपये

➡ थोडक्यात हकिकत –
यातील तक्रारदार हे त्यांचे भागीदारांसह 4K रियाल्टी या नावाने बांधकाम व्यवसाय करतात. त्यांनी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील मौजे नालेगाव येथे 2260.22 चौरस मीटर प्लॉट खरेदी केलेला आहे. सदर प्लॉटवर तक्रारदार यांना त्यांचे भागीदारांसह बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी बांधकामासाठी लागणारी बांधकाम परवानगी मिळण्यासाठी महानगरपालिका कार्यालय अहमदनगर येथे दि. 18.03.2024 रोजी ऑनलाईन अर्ज 254531 या क्रमांकाने केला.
सदर परवानगी साठी आलोसे क्रमांक 1 हे आलोसे क्र.2 यांच्या मार्फत 9,30,000/-रुपये लाचेची मागणी केली असता तक्रारदार यांना डॉ. जावळे आयुक्त आणि त्यांचे स्विय सहाय्यक देशपांडे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अँटी करप्शन ब्युरो, जालना कार्यालयाकडे दिनांक 19.06.2024 रोजी तक्रार दिली. तक्रारदार यांचे तक्रारी वरून आलोसे यांची लाच मागणी पडताळणी दिनांक 19.06.2024, 20.06.2024 रोजी केली असता
आलोसे क्र. 2 देशपांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या कडून बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी 8,00,000/- रुपये लाचेची मागणी पंचा समक्ष केली.लाच मागणी पडताळणी दरम्यान मनपा आयुक्त हे आलोसे क्र.2 यांना तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे विरुद्ध त्यांचेविरुद्ध पोलीस ठाणे तोफखाना जि. अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

▶️ *सापळा अधिकारी-
*किरण बिडवे,
पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो जालना
मो. क्र. 9011125553
*
*▶️ मार्गदर्शक -मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो. छत्रपती संभाजी नगर मो.न. 9923023361*
मा. मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो छत्रपती संभाजी नगर मो.नं. 98814 60103**

▶️ सहाय्यक सापळा अधिकारी-
शंकर मुटेकर, पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो ,जालना

➡️ सापळा पथक-
पोलीस अंमलदार गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश चेके, गणेश बुजाडे , शिवलिंग खुळे, अतिश तिडके, गजानन खरात विठ्ठल कापसे व भालचंद्र बिनोरकर.
अँटी करप्शन ब्युरो ,जालना.

*लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा.
*श्री. किरण बिडवे,
पोलीस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो जालना मो.क्र.9011125553*
कार्यालय 02482-220252*
टोल फ्री क्रमांक.1064

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles