आयुक्त व सहायकाच्या शोधासाठी तपास पथके रवाना
अहमदनगर महानगरपालिका आयुक्त डॉ.पंकज जावळे तसेच त्यांचे स्विय सहायक श्रीधर देशपांडे यांचेवर लाचमागणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाले असुन त्यांच्या शोधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची तीन पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.महापालिका आयुक्तांचे स्विय सचिव श्रीधर देशपांडे याच्या घराची पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे यांच्या पथकाने घरझडती घेतली असता घरझडतीमध्ये 93,000/- रूपये
रोख रक्कम, साडे आठ तोळयांचे सोन्याचे दागिने तसेच एकंदरीत नऊ मालमत्ता संदर्भातील कागदपत्रे मिळुन आली आहेत. सदर मालमत्ता नगर शहरातील उच्चभ्रु वस्तीमध्ये, उपनगरांमध्ये खरेदी केल्याची कागदपत्रे मिळुन आली आहेत. तसेच बीड जिल्हयात देखील शेत जमीन खरेदी
केल्याचे दिसुन येत आहे. तसेच एक चारचाकी वाहन, दोन इलेक्ट्रॉनिक मोपेड मोटार सायकल, दोन मोटार सायकल मिळुन आल्या आहेत. यातील लोकसेवकांनी बांधकाम परवानगी मिळवुन देण्यासाठी पंचांसमक्ष आठ लाख रूपयांची मागणी केल्याने तोफखाना पोलीस स्टेशन, जि.अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपअधीक्षक प्रविण लोखंडे,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर हे करीत आहेत.
नगर महानगरपालिका आयुक्त पंकज जावळेसह पिए च्या शोधासाठी तीन पथके रवाना
- Advertisement -