अहमदनगर महापालिकेची मुदत येत्या ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपणार आहे. तर जिल्हा परिषदेवर २१ मार्च २०२२ पासून प्रशासक आहे.
दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेवर आले. परंतु या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने व्हाव्यात यासाठी सरकारही फारसे आग्रही नसल्याचे दिसते. या निवडणुकांमध्ये किती यश मिळेल आणि त्याचा लोकसभा निवडणुकीवर किती परिणाम होईल, याचा अंदाज नसल्याने या निवडणुका पुढे कशा जातील याचीच काळजी घेतली जात असल्याचे बोलले जाते
महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी गेल्या दोन-तीन वर्षात गणेशोत्सव-नवरात्रापासून अन्य सार्वजनिक उत्सवात तरुण मंडळांना खूष ठेवण्यासाठी हात सैल सोडला आहे. त्याआधीही अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यातही पुढाकार घेतला होता. परंतु निवडणुकाच होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नसल्याने आणखी किती वाढीव खर्च करायचा, अशी चिंता इच्छुकांना पडली आहे.
अहमदनगरची मुदत पुढील महिन्यात संपणार,प्रशासकराज लवकरच सुरु होणार!
- Advertisement -