Sunday, September 15, 2024

मालमत्ता कर वसुलीसाठी आयुक्त सरसावले…१०० टक्के शास्तीमाफीचा निर्णय…

नगर : महापालिकेच्या मालमत्ता करावरील शास्तीमध्ये २८ सप्टेंबरपर्यंत १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी जाहीर केला आहे. लोकअदालतमध्ये सहभागी होऊन थकबाकीदारांना कराचा भरणा करावा, शास्तीवरील सवलत घ्यावी व जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. मनपाने गेल्या वर्षीही शास्तीमाफीची योजना लागू केली होती. मात्र नागरिकांनी त्याला अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. परिणामी मनपाच्या उत्पन्नात फारशी भर पडली नाही. मात्र, आता राष्ट्रीय लोकअदालतच्या पार्श्वभूमीवर दि. २८ सप्टेंबरपर्यंत शास्तीमाफी लागू करण्यात आली आहे.

नागरिकांना सर्व प्रभाग समिती कार्यालयात रोख पैसे भरण्यासाठी सुविधा आहेच. मात्र, घरबसल्या मोबाईल अॅप, वेबसाईटद्वारेही कर भरता येईल, या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन आयुक्त डांगे यांनी केले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व मनपाच्या वतीने २८ सप्टेंबर रोजी लोकअदालत होत आहे. यात थकबाकीदार मालमत्ताधारकांची प्रकरणे निकाली काढताना एकरकमी थकबाकी भरणाऱ्यांना शंभर टक्के शास्तीमाफी दिली जाणार आहे. त्यामुळे २८ सप्टेंबरपर्यंत कर जमा करून नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा. रोख स्वरूपात कर भरणा करण्यासाठी प्रभाग समिती कार्यालय क्र.१ सावेडी, प्रभाग समिती कार्यालय क्र.२ शहर, प्रभाग समिती कार्यालय क्र.३ झेंडीगेट, प्रभाग समिती कार्यालय क्र.४ बुरुडगाव येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच, क्युआर कोडद्वारे, चेकद्वारे कर स्वीकारला जाईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles