Wednesday, November 29, 2023

नवऱ्याचा पत्नी व भावाने केला खून, पोलिस तपासात समोर आले हे कारण,नगर जिल्ह्यातील घटना

दारुचे व्यसन व त्रासास कंटाळुन मयताची पत्नी व भावाने केला खुन, स्थानिक गुन्हे शाखेकडुन लोणी व्यंकनाथ, श्रीगोंदा येथील खुनाच्या गुन्ह्याची उकल.

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 25/09/23 रोजी महादेवाडी रोडचे पुला जवळ, लोणी व्यंकनाथ शिवार, ता. श्रीगोंदा येथे कोणीतरी अनोळखी इसमाने अज्ञात कारणासाठी यातील अनोळखी मयत इसमाचा दोरीने गळा आवळुन खुन करुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मयताचे तोंड जाळल्याने अनोळखी आरोपी विरुध्द पोसई/संपत सुर्यभान कन्हेरे यांचे फिर्यादी वरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नं. 830/2023 भादविक 302, 201 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खुनाची घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेपथक नेमुन सदर ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, पोहेकॉ/बबन मखरे, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, फुरकान शेख, पोकॉ/रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, आकाश काळे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, मपोना/भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, चापोहेकॉ/उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमन खुनाचे ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आवश्यक मार्गदर्शन करुन पथकास लागलीच रवाना केले. पथकाने घटना ठिकाणचे व आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करुन बेवारस मृत इसम हा बाबासाहेब ऊर्फ गणेश किशोर गोसावी, रा. सुकेवाडी, ता. संगमनेर याचा असल्याचे निष्पन्न केले. त्यावरुन मयताचे कुटूंबियांकडे विचारपुस करुन मयत बाबासाहेब गोसावी याचे बाबत माहिती घेत असताना मयताची पत्नी अनिता व भाऊ मनोज यांचे बोलण्यात विसंगती आढळुन आल्याने पथकाने मयताचा भाऊ नामे मनोज गोसावी याचेकडे अधिक सखोल व बारकाईने चौकशी करता त्याने मयत भाऊ बाबासाहेब ऊर्फ गणेश किशोर गोसावी यास दारु पिण्याचे व्यसन होते. तो दारु पिऊन आईवडील व कुटूंबियांना मारहाण करुन सारखा त्रास देत होता. दिनांक 24/09/23 रोजी भाऊ बाबासाहेब गोसावी हा दारु पिऊ त्रास देवु लागल्याने. मी, वहिनी अनिता व चुलत भाऊ सौरभ अशांनी बाबासाहेब याला दारु जास्त झाल्याने दवाखान्यात जायचे आहे असे म्हणुन स्विफ्ट गाडीत बसवले व रस्त्याने जाताना बाबासाहेब दारुच्या नशेत असताना त्याचे गळ्यात गाडीतील दोरी घालुन गळा आवल्याने तो मरण पावला व त्यानंतर नगर दौंड रोडवर रेल्वे ट्रॅक जवळ टाकुन, त्याची ओळख पटु नये म्हणुन त्याचे तोंडावर गाडीतील सिट कव्हर व पेट्रोल टाकुन पेटवुन दिल्याची कबुली दिल्याने आरोपी नामे 1) मनोज किशोर गोसावी वय 36 व 2) सौरभ मनोज गोसावी वय 20 व 3) अनिता बाबासाहेब ऊर्फ गणेश गोसावी सर्व रा. सुकेवाडी, ता. संगमनेर यांना ताब्यात घेवुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व मा. श्री. विवेकानंद वाखारे साहेब, उविपोअ, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: