मुस्लिम समाजाची अधोगतीवर विचार मंथन बैठक संपन्न.
अहमदनगर (प्रतिनिधि)- मुस्लिम समाजावर देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी माॅबलिंचींग, लव्ह जिहाद, बुरखा, मांसाहार अशा अनेक कारणाने हल्ले अत्याचार होत आहे. पोलीस, प्रशासन व राजकीय नेत्यांकडून पण समाजाला न्याय मिळत नाही. समाजात काम करणारे कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात अडकून बसले आहे. या सर्व बाबींना सामोरे जाण्यासाठी मुस्लिम समाजाला शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक, वैद्यकीय व वक्फ सारख्या विभागांमध्ये मुसंडी घ्यावी लागेल.या क्षेत्रातील मागासलेपण दूर झाल्याशिवाय मुस्लिम समाजाची प्रगती होणार नाही. असे प्रतिपादन तंन्जिमे मोमिनीनचे अध्यक्ष हाजी शौकत भाई तांबोली यांनी व्यक्ति केले. अकलियत सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था तर्फे तंन्जिमे मोमेनीन मार्फत अहमदनगर जिल्ह्यातील मुस्लिम समाजात सामाजिक कार्य करणारे कार्यकर्त्यांची बैठक नगर संभाजी नगर रोड येथिल कवीजंग लाॅन येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तंन्जिमे मोमिनीनचे अध्यक्ष हाजी शौकत भाई तांबोली होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अब्दुस सलाम खोकर, आर्किटेक्ट अर्शद शेख, डॉ. इमरान शेख, डॉ. जहीर मुजावर, एड. हाफिज जहागीरदार, एड. फारुक बिलाल, उद्योगपती मुबीन खान, मौलाना रियाज, उधोगपती करीम हुंडेकरी, अब्दुला हसन चौधरी संगमनेर, हुमायु अत्तार पाथर्डी, माजी उपनगराध्यक्ष हाजी नजीर, शफी जहागीरदार, मन्सूर भाई, मोहम्मद रफीक, अंजर खान, अजीम राजे आदिसह जिल्ह्यातील समाज बाधव मोठ्या संख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना हाजी शौकत तांबोली म्हणाले की, मुस्लिम समाजात धार्मिक कार्य मोठ्या प्रमाणात होतात. पण आपले धार्मिक मतभेदामुळे आपसातच मत भेद मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. आम्हाला याच्यात न पडता समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक, औधोगिक, वैद्यकीय, वक्फ साठी मोठे काम करण्याची गरज आहे. आज आम्ही अमेरिका, फलसतीन याबद्दल बोलत असतो चर्चा करतो पण आपल्या घरात काय चालले त्याकडे आमचे लक्ष नाही. आमची पिढी व्यसनाच्या आहारी नष्ट होत आहे. अर्ध्या रात्रीपर्यंत सोशल मीडियावर लागून चौक व कट्ट्याची शोभा वाढवत आहे. त्यावर आम्हाला लक्ष केंद्रित कण्याची गरज आहे. १९४७ पासून मुस्लिम समाजाची विविध विभागांमध्ये इतर समाजाच्या तुलनेत प्रगती ऐवजी अधोगती झाली. याला कारणीभूत असलेल्या व्यवस्थेमधून समाजाला स्वतःला मार्ग काढावा लागेल. त्यासाठी जमिनीस्तरावर, गाव पातळीपासून प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी तालुकास्तरावर असे कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात येतील. शिक्षणाचा प्रमाण व दर्जा यावर पण लक्ष केंद्रित करावे लागेल. आर्थिक उन्नती करिता विनव्याजी आर्थिक व्यवस्था निर्माण करून समाजाला प्रभोधित करावे लागेल. त्याचप्रमाणे उद्योग व्यवसाया मध्ये प्रशिक्षित करून लहान मध्यम मोठे उद्योग करण्यात प्रवृत्त करावे लागेल. जेणेकरून नोकरीच्या मागे न लागता स्वयंम रोजगार निर्माण करुन इतरांना रोजगार देण्याचे काम करावे लागेल. त्यासाठी विविध विभागातून शासकीय योजनांचा उपभोग कसा घेता येईल यासाठी प्रयत्न करावे लागेल. यासाठी अहमदनगर येथे मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्स ची स्थापना करण्यात आली.
वैद्यकीय विभागाकडून शासनाच्या निरनिराळ्या योजनेचा सामान्य नागरिकांना कसा फायदा होईल व त्याचबरोबर सध्या समाजामध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांकडून समाजाला कमीत कमी दराने वैद्यकीय सेवा कशी देता येईल यावर मार्गदर्शन करण्यात आले. मुस्लिम समाजाच्या ताब्यात असलेल्या वक्फ मिळकतीचा समाजासाठी कसा फायदा होईल याबाबत योग्य ती दिशा ठरवुन यासाठी कार्यालया मध्ये जाऊन अडचणी बाबत वक्फ बोर्डाकडे शासनाकडे वक्फच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात येईल व वेळ प्रसंगी आंदोलन ही करण्यात येईल.
प्रास्ताविक करताना सय्यद खलील यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.
यावेळी अब्दुस सलाम खोकर, आर्किटेक्ट अर्शद शेख, उद्योगपती करीम हुंडेकरी, अड. हाफीज जहागीरदार, डॉ. इमरान शेख, इंजि. तौसिफ शेख, मुबीन खान, मोहम्मद रफीक श्रीरामपूर, हाजी नजीर व जिल्हाभरातून वेगवेगळ्या तालुक्यातून आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून भविष्यात हाजी शौकत तांबोली यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी सुरू केलेल्या समाजाच्या प्रगतीसाठी असणाऱ्या प्रत्येक कार्यात सहभागी होण्याची हमी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंन्जिमे उर्दु अदबचे अध्यक्ष सय्यद खलील यांनी केली तर आभार निसार बागवान व आसिफ सर यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एड. हनिफ बाबुजी, शेख शाकीर, सैय्यद खलील, मोहंमद शोएब तांबोली, आसिफ सर, इलियास तांबोली, इंजि. मोहंमद अकील, इंजि. अब्दुला तांबोली, उसामा तांबोली यांनी भरपूर परिश्रम घेतले.
अहमदनगर येथे मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना
- Advertisement -