Tuesday, April 23, 2024

नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाचा सत्कार, माजी मंत्री कर्डिले म्हणाले विरोधकांकडे निवडणूकीतील अपयश झाकण्यासाठी सहानुभूती!

नगर तालुका व जिल्हा खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाचा सत्कार समारंभ संपन्न
नगर तालुका खरेदी विक्री संघ तसेच जिल्हा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार व भिंगार अर्बन बँक निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार समारंभ सन्मान संपन्न झाला.

माजी मंत्री तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत विरोधकांना भीती होती. त्यांनी निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले. त्यानंतर सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात त्यांनी स्वर्गीय दादा पाटील शेळके यांना श्रद्धांजली म्हणून आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. परंतु मागील सर्वच निवडणुकांमध्ये विरोधकांना पराभवाला सामोरे जावे लागत असल्याने माघारी घेतली असावी. खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून तसेच आमदारांच्या विकास निधी मधून बाजार समिती तसेच उपबाजार समित्यांच्या विकासाचा अनुशेष भरून काढला जात असून कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वर्गीय दादा पाटील शेळके यांचे नाव देण्याचे काम आपण केले. काँग्रेस मधून नुकतेच भाजपात प्रवेश केलेले विनायकराव देशमुख व माझे कायम कौटुंबिक स्नेह राहिला आहे. आगामी काळातील निवडणुका विनायकराव देशमुख यांचे नियोजन सर्वांना फायदेशीर ठरणार आहे. महाराष्ट्रातील बहुतांश खासदारांमध्ये आपल्या मतदारसंघाचे खासदार विखे पाटील यांचे नाव विकास कामांमध्ये अग्रेसर असून केंद्र व राज्याच्या माध्यमातून मतदार संघात मोठा निधी उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले. अनेक वर्षांपासून रखडलेली विकासकामे या काळात वेगाने पूर्ण झाले असून नगर शहरातील बहुप्रतिक्षित उड्डाणपूल तसेच शहराचे बाह्यवळण रस्ता, नगर – सोलापूर महामार्ग यांसह अनेक विकास कामे त्यांनी अत्यल्प काळात मार्गी लावले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये येथील मतदार खासदार विखे पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत असल्याचे पाहायला मिळत आहे.

यावेळी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह माजी मंत्री तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, विनायकराव देशमुख, हरिभाऊ कर्डिले, रावसाहेब पाटील शेळके, अंकुश शेळके, अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, भिंगार बँकेचे चेअरमन अनिल झोडगे व नवनिर्वाचित सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles