Tuesday, April 23, 2024

निलेश लंके यांचा विखेंवर वैयक्तिक हल्लाबोल पण अजित पवार गटानेच लंकेंच्या आरोपातील हवा काढली…

नगर : माजी आ. निलेश लंके यांनी जन संवाद यात्रेतून नगर लोकसभा मतदारसंघात संपर्क सुरु केला आहे. त्यांनी लोकसभेची तयारी दोन वर्षांपासून चालवली आहे. परंतु त्यांच्याकडून विखेंवर होणारे वैयक्तिक आरोप मतदारांच्या कितपत पचनी पडतात याची चर्चा सुरु झाली आहे. विखे पिता पुत्रांनी आपल्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्याचा आरोप ते करीत आहेत. त्यांचा हा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेच खोडून काढला आहे. विखेंनी त्रास दिल्याचे एक उदाहरण पुराव्यानिशी दाखवा असे आव्हानचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी लंके यांना दिले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणूनही लंके यांच्या पाठिशी तितकी ताकद अजून तरी उभी राहिलेली नाही. त्यांच्या जनसंवाद यात्रेच्या शुभारंभप्रसंगी काँग्रेसकडून श्रीरामपूरचे आ.लहू कानडे उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पाथर्डीचे ॲड.प्रताप ढाकणे यांनी लंकेंना मनापासून साथ दिली असली तरी कर्जत जामखेडचे आ.रोहित पवार हे लंकेंपासून अजून तरी अंतर राखूनच असल्याचे चित्र आहे. लंकेंची प्रा.राम शिंदेंशी असलेली जवळीक आ.रोहित पवारांना खटकणारी असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. दुसरीकडे श्रीगोंदा तालुक्यात महाविकास आघाडीची ताकद क्षीण झाली आहे. नागवडे दाम्पत्याने काँग्रेस सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे श्रीगोंद्यात लंके यांना स्वबळावरच संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत. पारनेरमध्ये मागील साडेचार वर्षात लंके यांच्या कार्यपध्दतीमुळे त्यांच्या जवळचे अनेक जण दुरावले गेले आहेत. या मंडळींची नाराजी दूर करण्याचे आव्हान लंके कशा पध्दतीने पेलतात हे पहावे लागेल. शेवगाव पाथर्डीत प्रताप ढाकणे वगळता मोठी शक्ती लंकेंच्या पाठिशी नाही. याउलट विखेंसाठी शेवगाव पाथर्डीतून आ.मोनिका राजळे, माजी आ.घुले बंधू तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा मतदार फायदेशीर ठरणार आहे. एकूणच सध्या प्रचाराच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात तरी दोन्ही उमेदवार एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत असून उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर खऱ्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles