Tuesday, February 27, 2024

राष्ट्रवादी भवन येथे प्रजासत्ताक दिन..शहर स्वच्छ सुंदर हरित करण्याचा संकल्प -संपत बारस्कर

प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले शहर स्वच्छ सुंदर हरित करण्याचा संकल्प – शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नगर –
प्रजासत्ताक दिनापासून भारतीय लोकशाहीला सुरुवात झाली असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाला संविधानाच्या माध्यमातून दिशा देण्याचे काम केले आहे. जगामध्ये भारतीय लोकशाही सर्वात श्रेष्ठ आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपण सर्वजण आपले शहर स्वच्छ सुंदर हरित करण्याचा संकल्प करूया. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिली.
काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा. माणिकराव विधाते, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, संभाजी पवार, विद्यार्थी काँग्रेसचे वैभव ढाकणे, युवक काँग्रेसचे इंजि. केतन क्षीरसागर, जॉय लोखंडे, स्वप्नील ढवण, गणेश बारस्कर, अमोल कांडेकर, ज्ञानदेव कापडे, संजय सपकाळ, विशाल बेलपवार, धीरज उकिर्डे, अरुण रेपाळे, गणेश बरबडे, दीपक आव्हाड, दीपक साठे, योगेश एरंडे, महेश गलांडे, विनोद जोंधळे, गिरीश जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. माणिकराव विधाते म्हणाले की, भारतीय लोकशाहीने देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार दिला असून लोकशाही मुळे देशातील समस्त नागरिक गुण्यागोविंदाने वावरत आहे आज प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशात भारतीय मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत असे ते म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles