राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची नगर शहर कार्यकारिणी जाहीर झाली. आमदार संग्राम जगताप, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी उपमहौपार गणेश भोसले, माजी शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, कुमारसिंह वाकळे, केतन क्षीरसागर, अभिजित खोसे, संजय सपकाळ, वैभव ढाकणे, उबेद शेख उपस्थित होते.
बारस्कर म्हणाले, “आमदार संग्राम जगताप हे राज्यातील एकमेव असे लोकप्रतिनिधी आहेत की, ते लोकांची ‘वन टू वन’ कामे करतात. त्यामुळे त्यांची लोकप्रियता सर्वाधिक आहे. त्यांनी आता नगर शहरातून राज्याचे नेतृत्व केले पाहिजे. यासाठी संघटनेने पुढच्या निवडणुकीत जगतापांना आमदार करण्याबरोबरच मंत्री करायचा निर्धार केला आहे”. आमदार जगताप यांनी आता प्रदेश पातळीवर कामाला सुरुवात करावी. राज्याचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा बारस्कर यांनी व्यक्त केली.
आमदार जगताप यांनी बारस्कर यांच्या या भाषणावर जोरदार फटकेबाजी केली. “मी लोकसभेचा उमेदवार नाही. पण पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेत काम करत राहणार आहे. विधानसभाच लढणार असल्याचे त्यांना सांगितले”.